Bangladesh Hindu Arrested for Blasphemy : चितगाव (बांगलादेश) येथे पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या हिंदु तरुणाला पोलिसांनी घेतले कह्यात !
मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घालून हिंदु तरुणाला कह्यात देण्याची केली मागणी !
चितगाव (बांगलादेश) – महंबद पैगंबर यांचा फेसबुकवर कथित अवमान केल्यावरून येथील पटिया पोलीस ठाण्यातील पोलिसांनी २२ वर्षीय पार्थ बिस्वास या हिंदु तरुणाला कह्यात घेतले होते. धर्मांध मुसलमानांनी या पोलीस ठाण्याला घेराव घालून पार्थ याला कह्यात देण्याची मागणी केली. या मुसलमानांमध्ये स्थानिक मदरशातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांनी या वेळी येथील सैन्याच्या २ वाहनांवर आक्रमण केले. या वाहनांत पार्थ असल्याचे समजून त्यांनी हे आक्रमण केले. यात सैन्याधिकारी घायाळ झाला. या घटनेनंतर लगेचच कोणत्याही अनुचित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस आणि सैन्य यांची मोठी तुकडी या परिसरात तैनात करण्यात आली. ही घटना ३० सप्टेंबरला घडली. काही आठवड्यांपूर्वी उत्सव मंडल या हिंदु तरुणालाही अशाच प्रकारे धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याचा घुसून मारहाण केली होती. यात उत्सव गंभीररित्या घायाळ झाला होता.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंना नष्ट करण्यासाठी तेथील मुसलमान हिंदूंवर ईश्वनिंदेचा ठपका ठेवतात आणि त्यांची हत्या करतात. अशी अनेक प्रकरणे घडत असूनही केंद्र सरकार तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे का येत नाही, हे अनाकलीनय आहे ! |