Nettaru Murder Mosque : नेट्टारू यांच्या हत्येचा कट मशिदीत रचला होता !

कर्नाटकातील भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण

  • स्थानिक नागरिक इब्राहिम खलील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

  • अझहरुद्दीन आणि जमाल यांचा हात 

  • मशिदीत आतंकवादी कारवाया चालू असल्याचाही आरोप

कर्नाटकातील भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू (प्रतीकात्मक चित्र)

सुळ्या (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांची हत्या करण्याचा कट बेल्लारी येथील झकेरिया जुमा मशिदीत अझहरुद्दीन आणि जमाल यांनी रचला, अशी माहिती इब्राहिम खलील यांनी फेसबुकद्वारे प्रसारित केली आहे. या पोस्टनंतर अझहरुद्दीन आणि जमाल यांनी पोलीस ठाण्यात जाऊन खलील यांच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलीस या आरोपांचे अन्वेषण करत आहेत. प्रवीण नेट्टारू यांची वर्ष २०२२ मध्ये हत्या करण्यात आली होती. इब्राहिम खलील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रवीण नेट्टारू यांना मारण्यासाठी जमाल बेल्लारे आणि अझहरुद्दीन बेल्लारे यांनी सर्वप्रथम बेल्लारी येथील झकेरिया मशीद इमारतीत संभाषण चालू केले होते. मी हे कुठेही सांगायला सिद्ध आहे. मला टी.व्ही. ९ वाहिनीच्या मंगळुरूतील पत्रकाराने संपर्क केला होता, त्यांना मी घडलेल्या घटनेबद्दल सत्य सांगेन. सत्य सांगायला घाबरण्याची आवश्यकता नाही. हे दोघे आणि मशिदीचे किंवा अन्य कुणीही असो, मी न्यायालयात जाऊन मरीन. बेल्लारीच्या केंद्र मशिदीत आतंकवादी कारवाया चालू आहेत. याला आपण सर्वांनी पाठिंबा देऊ नये. या संदर्भात बेल्लारे जमात यांच्याकडून इब्राहिम खलील यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे, तर इब्राहिम खलील यांनीही पोलिसांत तक्रार करत ‘मला वर्ष २०१८ पासून अझहरुद्दीन आणि जमाल यांच्याकडून धमक्या मिळत आहेत’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु नेत्यांच्या हत्यांचे कट मशिदीत शिजतात, हे यातून स्पष्टपणे पुढे आले आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार या माहितीवरून या प्रकरणी अन्वेषण करून जिहाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा करता येत नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !