‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील लेखात असलेले श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे छायाचित्र सजीव भासण्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
‘२४.११.२०२३ या दिवशी मी सेवेनिमित्त ‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वैकुंठ चतुर्दशीशी संबंधित भक्तीसत्संगाचा लेख वाचला. त्या लेखात असलेले श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहून मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या छायाचित्रात मला पुष्कळ जिवंतपणा जाणवला.
२. मी त्यांना आपोआपच आत्मनिवेदन केले. तेव्हा ‘त्या माझ्याकडेच पहात आहेत’, असे मला वाटले. मी त्यांना आत्मनिवेदन करत एक प्रयोग केला. मी त्या छायाचित्राकडे डोळे फिरवून डाव्या, उजव्या आणि समोरील दिशेने पाहिले. आश्चर्य म्हणजे, मी ज्या बाजूने छायाचित्राकडे पहात होते, त्या दिशेने छायाचित्रातील श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे नेत्र वळत होते.
३. मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला त्यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत असे. ‘ते माझ्याकडेच पहात आहेत’, असे मला जाणवत असे. त्याप्रमाणेच मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहून जाणवले. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘गुरुतत्त्व सतत माझ्या समवेत असते’, याची देवाने मला अनुभूती दिली’, त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२४.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |