मुंबई-पुणे यांच्यातील ‘मिसिंग लिंक’ मार्गाचे काम अंतिम टप्प्यात !
मुंबई – मुंबई – पुणे प्रवासातील अंतर न्यून करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी दोन डोंगरांमध्ये देशातील सर्र्वांत उंच केबल पूल निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हा पूल भूमीपासून १८३ मीटर उंच आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेल्या या मार्गावर २ बोगदे आणि २ केबल पूल असतील. जून २०२५ मध्ये हा मार्ग चालू होण्याची शक्यता आहे.
सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोली सोडल्यावर सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचे अंतर १९ कि.मी. आहे. ‘मिसिंग लिंक उभारण्यात आल्यानंतर हे १९ कि.मी.चे अंतर १३.३ कि.मी. होईल, म्हणजे ६ कि.मी. अंतर न्यून होणार आहे.