शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
|
बदलापूर – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शाळा संचालक आणि सचिव यांनी याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. ‘दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही’, अशी न्यायालयाची टिप्पणी आहे.