मालेगाव येथे सकल हिंदु समाजाकडून निवेदन !
तिरंगा रॅलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील विविध फलकांना काळे फासल्याचे प्रकरण !
मुंबई – तिरंगा रॅलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील विविध फलक, तसेच रस्त्यावरील कि.मी. दर्शवणारे मैलाचे दगड यांना काळे फासण्यात आले होते. या निषेधार्थ मालेगाव येथील पोलीस ठाण्यात सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. एम्.आय.एम्.चे नेते इम्तियाज जलील यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.
‘इम्तियाज जलील या हिरव्या सापाला अटक करा’, अशी मागणी शिवभक्त करत आहेत. याला माझाही पाठिंबा आहे, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. |