थोडक्यात महत्त्वाचे : धर्मांधांकडून बनावट १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त… ११ वर्षीय मुलाला चिरडले !….

धर्मांधांकडून बनावट १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त

कल्याण – भिवंडीतील मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे बनावट तूप अन् लोणी विक्रीसाठी येथे आले होते. त्यांना साहाय्यक आयुक्त ठाकूर यांनी तूप, लोणी खरेदीच्या पावत्या आणि ‘ते कुठून आणले ?’, असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते तूप खरेदीच्या पावत्या दाखवू शकले नाहीत. हे संशयास्पद वाटल्याने बाजार परवाना पथकाने १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त केले. शुद्धतेचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका : बनावट पदार्थ बनवणार्‍यांच्या टोळीचा शोध पोलिसांनी घ्यावा !


११ वर्षीय मुलाला चिरडले !

भंडारा – भोजपूर मार्गावर भरधाव स्कूल व्हॅनने (विद्यार्थ्यांना शाळेत सोडणार्‍या वाहनाने) सायकलवरून जाणार्‍या मुलाला चिरडले. या अपघातात आदि बागडे (वय ११ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनस्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्याला अडवून पोलिसांकडे सुपूर्द केले.

संपादकीय भूमिका : किती अपघाती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन उपाययोजना काढणार ?


महिलेची आर्थिक फसवणूक करणारे दोघे अटकेत !

सोलापूर – महिला आधुनिक वैद्यांना संपर्काद्वारे मुंबई गुन्हे शाखेचे पथक असल्याचे खोटे सांगून त्यांच्या आधारकार्डवरून सीमकार्डची खरेदी करून अश्लील संकेतस्थळाला (पॉर्न साईटला) भेट दिल्याचे सांगण्यात आले. यामुळे महिलेला तिच्या पतीसह अटक होईल, अशी भीती दाखवली. अटक रोखण्यासाठी पैशांची मागणी केल्यावर महिलेनेही तिला दिलेल्या ४ बँक खात्यांमध्ये ६७ लाख २४ सहस्र रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.