श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचे धुवायचे कपडे नीट घडी घालून व्यवस्थित ठेवल्यामुळे त्यातून चांगली स्पंदने जाणवणे आणि त्यांच्या खोलीत दैवी सुगंध येणे

‘एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचे धुवायचे कपडे घेऊन जाण्यासाठी मला त्यांच्या खोलीत बोलावले होते. खोलीत त्यांनी त्यांचे धुवायचे कपडे सुंदर पद्धतीने घडी करून आणि एका रांगेत एकावर एक व्यवस्थित ठेवले होते.

कु. मानसी अग्निहोत्री

तेव्हा ‘ते कपडे धुतलेलेच आहेत’, असे मला वाटले. प्रत्यक्षात मी माझे धुतलेले कपडेही एवढ्या व्यवस्थितपणे ठेवत नाही. मी माझे कपडे नुसते गुंडाळून ठेवते. त्यांच्या कपड्यांकडे बघून मला पुष्कळ चांगली स्पंदने जाणवत होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘आपली प्रत्येक कृती परिपूर्ण, म्हणजे ‘सत्यम् शिवम् सुंदरम् ।’ असायला हवी.’’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कपडे ठेवण्याच्या कृतीतून याची मला प्रचीती आली. ‘त्यांच्या खोलीत एक दैवी मधुर सुगंध येतो, जो त्यांच्याकडे जाण्यासाठी आकर्षित करतो’, असे मला वाटते. त्यांच्या खोलीच्या बाहेर आल्यावर तो सुगंध येत नाही.’

– कु. मानसी विनोद अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२३)