श्रीसत्‌शक्तींची तळमळ आणि प्रीती, करील गुरुदेवांची विश्वकल्याणाची स्वप्नपूर्ती ।

 कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात प्रसादस्वरूप मिळालेल्या कमळाच्या हारासह श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (वर्ष २०२३)

श्री गुरूंच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी
विदेशातही श्री गुरूंचे प्रतिनिधित्व करी ।
भक्ताला स्वतःकडे बोलावूनी श्रीहरि
देश-विदेशांत भक्ताची महती करी ।।

 अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रित श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मंदिराच्या उद्घाटनानंतर परिसरात एका क्षणी (फेब्रुवारी २०२४)
अयोध्या येथील नूतन श्रीराममंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित राहिलेल्या सनातनच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (जानेवारी २०२४)

लौकिकदृष्ट्या ही महती असे जरी ।
सहस्रोपटींनी सनातनचा प्रचार करी
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या
दिव्यत्वाची प्रचीती येई सर्वांना या भूवरी ।।

 गोव्यात झालेल्या ‘सी-२०’ कार्यक्रमात डावीकडून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, ‘सी-२०’च्या आयोजक शशी बाला आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (मे २०२३)

साधकांचे दायित्व समर्थपणे सांभाळण्यासमवेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिनिधी म्हणूनही सार्थ ठरत आहेत. विविध सामाजिक कार्यक्रमांतील त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमातील मान्यवरांनाही त्यांचे चैतन्य अनुभवायला मिळत आहे. येथे देश-विदेशांतील आध्यात्मिक कार्यक्रमांतील त्यांच्या सहभागाची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून दिली आहे.

प्रार्थना

‘हे श्रीसत्‌शक्ति, हे माते, आम्हा सर्व साधकांचे तुला साष्टांग नमन असो. अखंड गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला बळ आणि चैतन्य दे. आमची गुरुदेवांप्रती निष्ठा वाढून त्यांना अपेक्षित अशी साधना तूच आमच्याकडून करून घे. आम्हाला सतत गुरुचरणांचा ध्यास लागू दे. हे श्री महालक्ष्मीस्वरूपिणी, श्रीसत्‌शक्ति, श्रीविष्णुरूपी गुरुदेवांचा संदेश, आशीर्वाद आणि चैतन्य तुझ्या माध्यमातून सर्व साधक-भक्तांना सतत मिळत राहो’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ग्लोबल स्पिरिच्युअल कार्यक्रम झाला. त्याचे रामनाथी येथील आश्रमात निमंत्रण स्वीकारतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (मार्च २०२४)
 फ्रान्स येथे ‘भारतगौरव पुरस्कार’ सन्मानासाठी गेल्या असतांना तेथील अन्य धार्मिक संस्थांच्या महिला मान्यवरांसमवेत श्रीसत्‌शक्ति (साै.) बिंदा नीलेश सिंगबाळ (५ जून २०२४)

कृतज्ञता

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्‍या ठिकठिकाणच्या साधकांसाठी, आश्रमात राहून साधना अन् सेवा करणार्‍या साधकांसाठी, तसेच सनातनच्या सर्वच साधकांसाठी आधारस्तंभ आहेत. त्यांना समाजात मिळत असलेले स्थान पहाता त्या सनातनसाठी लौकिकदृष्ट्याही भूषणावह आहेत. त्यांच्या चरणी, तसेच त्यांच्यासारखे अद्वितीय व्यक्तीमत्त्व लीलया घडवून आणणारे सच्चिदानंद परब्रह्म

डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !