Siddaramaiah Land Scam : भूमी घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला आहे. ‘मैसुरू अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी’च्या (‘मुडा’च्या) भूमी घोटाळ्याशी हे प्रकरण संबंधित आहे. ईडीने सिद्धरामय्या यांच्यासह त्यांची पत्नी, मेहुणे आणि इतर यांची नावेही या गुन्ह्यांत समाविष्ट केली आहेत.
टी.जे. अब्राहम, प्रदीप आणि स्नेहमोयी कृष्णा या कार्यकर्त्यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्र्यांनी ‘मुडा’ अधिकार्यांशी संगनमत करून १४ महागड्या भूमी फसवणूक करून मिळवल्या आहेत.
संपादकीय भूमिका‘काँग्रेस म्हणजे घोटाळा’ आणि ‘घोटाळा म्हणजे काँग्रेस’, असे समीकरण निर्माण झाले आहे आणि तेच नेहमी समोर येत असते ! |