Israel student : संस्कृत शिकण्यासाठी इस्रायलमधून कर्नाटकात आले विद्यार्थ्यांचे पथक !
चिक्कमगळूरू (कर्नाटक) – संस्कृत शिकण्यासाठी इस्रायल देशातील विद्यार्थ्यांचा एक गट चिक्कमगळूरू येथे आला आहे. इस्रायलमध्ये जन्मलेले हे विद्यार्थी भारतीय संस्कृती, परंपरा आणि आचार-विचार यांचा अभ्यास करत आहेत.
A group of students from #Israel on visit to Karnataka to learn Sanskrit and Valmiki #Ramayana
They are making efforts to converse exclusively in Sanskrit!
It’s infuriating that while foreign students come to India to learn #Sanskrit, parties like the #Congress in India label… pic.twitter.com/Nmp1pAadxx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 1, 2024
वाल्मीकि रामायणातील श्लोकांचे अध्ययन !
चिक्कमगळूरूच्या हिरेमगळूरु येथील श्री कोदंडराम देवालयात या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्कृतमध्ये पी.एच्डी केलेले इस्रायली प्राध्यापक रफी हे त्यांच्या ६ विद्यार्थ्यांसोबत आले आहेत. हे विद्यार्थी इस्रायलमध्ये कला शाखेत शिकत आहेत. सध्या हे पथक हिरेमगळूरुमध्ये वाल्मीकि रामायण महाकाव्याच्या सुंदरकांडातील काही श्लोक शिकत आहे.
संस्कृतमध्येच संभाषण करण्यास प्रयत्नशील !
संस्कृतचे शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आता पूर्णपणे संस्कृतमध्येच बोलण्यास समर्थ झाले आहेत. यासह हे विद्यार्थी भारताच्या भव्य परंपरेमुळे प्रभावित झाले आहेत, असे शिक्षक वैष्णव यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाविदेशातील विद्यार्थी भारतात येऊन संस्कृत शिकतात, तर भारतात काँग्रेससारखे पक्ष संस्कृतला ‘मृत भाषा’ संबोधून तिला संपवण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! |