Gomutra Prashan Before Garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर

  • भाजपच्या जिल्हाध्यक्षाची मागणी

  • अहिंदूंचा गरब्यातील प्रवेश रोखण्यासाठी सुचवली उपाययोजना

वर्तुळात इंदूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा

इंदूर – मागील काही वर्षांपासून गरब्याच्या ठिकाणी लव्ह जिहादचे प्रकार समोर आल्याने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये अहिंदूंना प्रवेश न देण्याची नवरात्रोत्सव मंडळांनी आग्रही भूमिका घेतली आहे. अहिंदूंनी नवरात्रोत्वात गरबा खेळण्यासाठी येऊ नये, यासाठी अनेकांनी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. इंदूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी ‘गरब्याच्या मंडपात येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करण्यास द्यावे’, अशी सूचना आयोजकांना केली आहे.

श्री. चिंटू वर्मा म्हणाले की,

१. गरब्याचे आयोजन करणार्‍यांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी ‘गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का?’, याची निश्‍चिती केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी मंडपात येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहिजे.

२. काही वेळा भलतेच लोक गरब्याच्या ठिकाणी येत असल्याचे समोर आले आहे. आधार कार्डमध्येही फेरफार केले जातात. त्यामुळे एखाद्याची खरी ओळख लपवता येते. त्यामुळे ‘एखादी व्यक्ती हिंदु आहे कि नाही ?’, याची पडताळणी कशी करणार ?

३. हे लक्षात घेऊन गरबा खेळ्यासाठी मंडपात प्रवेश करणार्‍या सर्वांना गोमूत्र पिण्याची सक्ती केली पाहिजे. हिंदु असणारी व्यक्ती, यास नकार देणार नाही.

(म्हणे) ‘भाजपाकडून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न !’ – काँग्रेस

मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नीलभ शुक्ला यांनी सांगितले की, भाजपला गोमूत्राचे राजकारण करायचे आहे. भाजपकडून गोमूत्र प्राशन करण्यासाठीची मागणी पुढे आल्यामुळे समाजात आणखी ध्रुवीकरण वाढेल. आधी भाजपच्या नेत्यांनी गरब्याच्या मंडपात प्रवेश करतांना गोमूत्र प्यावे आणि  तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करावा. (हिंदूंच्या रक्षणासाठी स्वतः काही करायचे नाही आणि इतर कुणी प्रयत्न करत असेल, तर त्यांना नावे ठेवण्याची काँग्रेसवाल्यांची जुनी खोड आहे.  अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची वेळ आता आली आहे ! -संपादक)

संपादकीय भूमिका

मागील काही वर्षांपासून गरब्यामध्ये मुसलमानांना प्रवेश मिळू नये, यासाठी हिंदू सतर्क होऊन प्रयत्न करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. असे असले, तरी हिंदूंच्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सोडाच, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !