Israeli Forces enter Lebanon : इस्रायलचे सैन्य लॅबनॉनमध्ये घुसले !

तेल अविव – इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले आहे. इस्रायल संरक्षण दलाने (आय.डी.एफ्.ने) १ ऑक्टोबरला सकाळी ही माहिती दिली. आय.डी.एफ्.ने ३० सप्टेंबरला रात्री दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाची स्थाने आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सीमेवरील गावांमध्ये मर्यादित स्वरूपात सैनिकी कारवाई चालू केली आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, सीमेजवळून हिजबुल्ला इस्रायलवर आक्रमण करतो. हिजबुल्लावर अशा प्रकारे आक्रमण करण्यासाठी सैनिकांनी प्रशिक्षण घेतले होते. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैनिक गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्यावर आक्रमण करत आहेत. यामध्ये इस्रायली हवाईदल सैन्याला साहाय्य करत आहे. वर्ष २००६ नंतर इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या वेळी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात ३३ दिवस युद्ध झाले. यामध्ये १ सहस्र १०० हून अधिक लेबनीज मारले गेले, तर इस्रायलमधील १६५ लोकांचा मृत्यू झाला होता.