प्रयागराज येथील कुंभपर्वाच्‍या कालावधीत केलेल्‍या साधनेचे १ सहस्र पटींनी फळ मिळत असल्‍याने धर्मप्रसाराच्‍या सेवेत (समष्‍टी साधनेत) सहभागी व्‍हा !

प्रयागराज येथील कुंभमेळ्‍याच्‍या कालावधीत सर्वत्रच्‍या साधकांना सेवेची अमूल्‍य संधी !

१३.१.२०२५ ते ५.३.२०२५ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व असणार आहे. या कालावधीत संपूर्ण जगभरातील ४० कोटी भाविक प्रयागराज येथे येण्‍याची शक्‍यता आहे. या पर्वाच्‍या स्‍थळी आणि काळात केलेल्‍या साधनेचे फळ इतर स्‍थळ-काळ यांच्‍या तुलनेने १ सहस्र पटींनी अधिक मिळते. या काळात सर्व देवता, सर्व तीर्थे, संतसमुदाय आदी प्रयागक्षेत्री उपस्‍थित असतात. अशा काळात अधिकाधिक वेळ साधनेसाठी दिल्‍याने या सर्वांचा आशीर्वाद लाभून आपले कार्य अल्‍पावधीत पूर्णत्‍वाला जाते.

या पर्वाच्‍या कालावधीत प्रयागराज येथील कुंभक्षेत्रावर धर्मप्रसार आणि हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान व्‍यापक प्रमाणात राबवण्‍यात येणार आहे. या अंतर्गत ६ मोठी हिंदु राष्‍ट्र जागृती करणारी फलक प्रदर्शने आणि १५ हून अधिक अध्‍यात्‍मविषयक ग्रंथप्रदर्शने लावण्‍यात येणार आहे. तसेच या काळात विविध धार्मिक मंडपांमध्‍ये हिंदु राष्‍ट्र विषयक व्‍याख्‍याने देणे, पत्रकांचे वितरण करणे, समविचारी संतांना संपर्क करणे, हिंदु राष्‍ट्र अधिवेशन, संत संमेलनांचे आयोजन करणे इत्‍यादी उपक्रम आयोजित करण्‍यात येणार आहेत.

कुंभमेळ्‍याच्‍या सेवेसाठी जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून नावनोंदणी करा !

कुंभपर्वाच्‍या धर्मप्रसारांतर्गंत सेवेच्‍या पूर्वसिद्धतेला १.१२.२०२४ या दिवसापासून प्रयागराज येथे आरंभ होणार आहे. प्रत्‍यक्ष धर्मप्रसाराच्‍या सेवेसाठी ७.१.२०२५ पासून २०.२.२०२५ या दिवसापर्यंत अजूनही मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे. जे या धर्मप्रसाराच्‍या सेवेत सहभागी होण्‍यास इच्‍छुक आहेत, त्‍यांनी जिल्‍हासेवकांशी संपर्क साधावा. नोकरी करणार्‍यांनी शक्‍य असल्‍यास कार्यालयातून (ऑफिसमधून) रजा काढून या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्‍यावा. कुंभमेळ्‍याला न्‍यूनतम १५ दिवस सेवेत सहभाग घेणे आवश्‍यक आहे; कारण त्‍या काळात तेथे प्रचंड थंडी असते. अशा वेळी तेथील वातावरणात जुळवून घेण्‍यासाठी कार्यकर्त्‍यांना २ – ३ दिवस लागतात.

कुंभपर्व काळात धन अथवा वस्‍तू स्‍वरूपात अर्पण करण्‍याची अमूल्‍य संधी !

या कुंभपर्वाच्‍या काळात ‘सत्‍पात्रे दानम्’ यानुसार दानधर्म केल्‍यास त्‍याचा साधनेसाठी १ सहस्र पटींनी लाभ होतो. या धर्मप्रसारसेवेत भारतभरातून वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या सर्वांचा निवास, भोजन आदींसह अन्‍य अनेक गोष्‍टींची व्‍यवस्‍था करावी लागणार आहे. यासाठी धन आणि वस्‍तू यांची आवश्‍यकता आहे. यासाठी हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि अर्पणदाते यांनी या धर्मप्रसाराच्‍या कार्यात यथाशक्‍ती दान (अर्पण) करावे, असे आवाहन सनातन संस्‍थेने केले आहे. यासाठी आपण सनातनच्‍या साधकांच्‍याशी संपर्क साधावा. कुंभपर्वात कोणत्‍या वस्‍तूंची आवश्‍यकता आहे ?, याची सूची संबंधितांकडून आपल्‍याला उपलब्‍ध होईल.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्‍यश्री सावंत : ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्‍यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन : ४०३४०१

कुंभमेळ्‍याच्या सेवेसाठी ज्‍यांनी नावनोंदणी केली आहे, त्‍यांनी त्‍वरित तिकीट आरक्षण करा !

कुंभपर्वाच्‍या धर्मप्रसारांतर्गंत सेवेसाठी आतापर्यंत ज्‍यांनी नावनोंदणी केली आहे, त्‍यांनी तिकीट आरक्षण शीघ्रगतीने करावे. या कालावधीत अनेक जण प्रयागराज येथे प्रवास करत असल्‍याने ४ महिने आधीच आरक्षण करून घ्‍यावे.