स्‍वभावदोष-निर्मूलनाच्‍या संदर्भातील दृष्‍टीकोन !

पू. संदीप आळशी

१. ‘चित्तशुद्धीसाठी वर्षानुवर्षे तप, ध्‍यान, योग आदी करण्‍यापेक्षा सोपा आणि शीघ्र मार्ग म्‍हणजे, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी शिकवलेली ‘स्‍वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आचरणात आणणे होय.

२. ‘कळतं पण वळत नाही’, याला एकच उत्तर आणि ते म्‍हणजे गुरुदेवांनी शिकवलेली ‘स्‍वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ !

३. देवाचे सर्वांवर सारखेच प्रेम असते; म्‍हणून आपण दुसर्‍यांविषयी नकारात्‍मक बोललो, तर देव आपल्‍यावर अप्रसन्‍न होतो.

४. आपली चूक लपवण्‍यासाठी आपण कितीही चतुराईने वागलो, तरी स्‍वतःच्‍या मनापासून आणि त्‍याहूनही अधिक ईश्‍वरापासून ती चूक लपत नसते. त्‍या चुकीचे फळ कधी ना कधी भोगावेच लागते.’

– (पू.) संदीप आळशी (११.९.२०२४)