Nepal Floods : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी ३ सहस्र सैनिकांना तैनात करण्यात आले आहेत. पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नेपाळमधील नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांनाही पूर आला आहे. नेपाळच्या नद्यांतून ५ लाख ९३ सहस्र क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गंडक धरणातील पाणी ५ लाख क्युसेकवर पोचणार आहे.