पुणे येथे नोकरीचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्या ३ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
पुणे – नोकरीचे आमीष दाखवून पुण्यात बोलावणे, खाद्यपदार्थांतून गुंगीचे औषध देणे, बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन बलात्कार करणे, संबंधांतून तरुणी गर्भवती झाल्यानंतर धमकावून गर्भपात करणे, या सर्व छळाला कंटाळून श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) येथील २८ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१५ पासून चालू होता.
नोकरीच्या निमित्ताने पुण्याला बोलावून फसवले. गर्भवती राहिल्यानंतर चंदननगर येथील कल्पना रुग्णालयामध्ये बळजोरीने माझा गर्भपात केला. अनेक वेळा अनैसर्गिक संबंध ठेवले. गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला, असे पीडितीने तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कारागृहातच डांबायला हवे ! |