सांगली येथील आरोग्य आणि रक्तदान शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सांगली, ३० सप्टेंबर (वार्ता.) – येथील बापट बाल शिक्षण मंदिर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना महाराष्ट्र राज्य आणि उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद़्घाटन पैलवान श्री. पृथ्वीराज भैय्या पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. महिलांसाठी खर्चिक असणारी मेमोग्राफी पडताळणी प्रक्रिया, तसेच आरोग्याच्या समस्यांची पडताळणी विनामूल्य करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य शिबिराचे मुख्य संयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक येडके, विनायक येडके मित्रपरिवार मार्गदर्शक श्री. गोपाळ(भाऊ)पवार, कार्याध्यक्ष श्री. अभिमन्यू भोसले, उपाध्यक्ष श्री. अंकुश गोडसे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना सांगली जिल्हाध्यक्ष
श्री. कृष्णा खंडेकर, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. शिवतेज सावंत, त्याचसमवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख मराठा स्वराज्य संघ जिल्हाध्यक्ष श्री. उमाकांत कार्वेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख राणी ताई कमलाकर, शिवसेना शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी, भाजपच्या उपाध्यक्ष सुनीताताई इनामदार आदींनी केले होते. याप्रसंगी असंख्य नागरिक आणि महिला यांनी या शिबिराचा लाभ घेतला. सर्व नागरिकांनी संयोजकांना आशीर्वाद दिले.
मराठा सेवा संघ, सकल हिंदु समाज या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक शिबिराला उपस्थित होते. प्रामुख्याने मराठा सेवा संघाचे श्री. महादेव बापू साळुंखे, सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्र जिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, श्री. अण्णा कुरळपकर उपस्थित होते. शिबिरात श्री. विनायक येडके यांनी ‘कुलदेवच्या नामजपाचे महत्त्व, देवळाची सात्त्विकता राखा, जेवणाचे ताट कसे वाढावे ?, दिवे लावणीच्या वेळा हे करा, शिवपूजेची वैशिष्ट्ये, अशी आध्यात्मिक माहिती देणारे सनातन संस्थेचे १४ फलक शिबिराच्या ठिकाणी लावण्यात आले होते. यातून मोठ्या प्रमाणात अध्यात्मप्रसार झाला. |