भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे, हाच जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त होण्याचा उपाय !
आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही. आपल्याला सर्व समजते; परंतु प्रयत्न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरता एकच खात्रीचा उपाय आहे, ‘भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे.’ ‘रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लाभू दे’, असे कळकळीने रामाला सांगावे आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याविना रहाणार नाही, याची निश्चिती बाळगा.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज