कृपाळू श्रीहरि, करी मजवरी करुणा ।
‘७.८.२०२४ या दिवशी मला ताप, खोकला आणि पुष्कळ थकवा होता. याविषयी मी एका साधकाला सांगितल्यावर त्याने मला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांच्या खिशात जाऊन त्यांच्या हृदयाची स्पंदने ऐकण्याचा करायला सांगितला. त्याप्रमाणे मी तो प्रयोग केला. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मला पुढील काव्य सुचले. ते श्रीहरीच्या सुकोमल चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.
ऐकूनी श्रीहरीची हृदय स्पंदने ।
विरघळली गात्रे बनली सुमने ॥
श्रीहरीच्या चरणी झाली अर्पण ।
श्रीहरिकृपेने ॥ १ ॥
देहाचे दुःख बनले निमित्त ।
सत्संग देण्या आतुर श्रीहरीचे चित्त ॥
निरोप धाडिती त्वरित ।
सूक्ष्मातून हृदयी घेती समीप ॥ २ ॥
श्रीहरीचे दिव्य भवन ।
तेथून पाठवले आमंत्रण ॥
रोग आणि त्रास यांचे झाले निवारण ।
करिता श्रीहरीचे रम्य ध्यान ॥ ३ ॥
श्रीहरीसी आळविले ‘परात्पर गुरु डॉक्टर’ या नामे ।
सर्व कामे सोडूनी त्वरित धाविती ॥
सामान्य जिवासाठी श्रीहरि परिश्रमे ।
उचंबळे कृतज्ञतेने हृदय, नेत्रही पाणावती ॥ ४ ॥
श्रीहरि, तू यावे ।
मज तुझ्यासंगे न्यावे ॥
संसारसागरातील हेलकावे ।
तव इच्छेने हिंदोळावे ||
श्रीहरि, तुझी म्हण मजला ।
काहीतरी खूण दे या मना ।
तव विरह आता साहवेना ।
कृपाळू श्रीहरि, करी मजवरी करुणा ॥ ६ ॥
– सौ. मृणाल नानिवडेकर, मिनेसोटा, अमेरिका. (२४.८.२०२४)
|