Ahmed Arrested Obscene Video : टोंक (राजस्थान) येथे शाळेत विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवणार्या अहमद याला अटक !
टोंक (राजस्थान) – येथे सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५० वर्षीय लायक अहमद कुरेशी याने २७ सप्टेंबर या दिवशी त्याच्या भ्रमणभाषवर एका अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवला. या वेळी त्याने विद्यार्थिनींचा विनयभंगही केला. विद्यार्थिनीने घरी पोचल्यानंतर घरच्यांना शिक्षकाच्या अश्लील वर्तनाविषयी माहिती दिली. विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून लायक अहमद याला अटक केली. लायक अहमद याला बडतर्फ करण्याची मागणी ग्रामस्थ आणि पीडित मुलीचे कुटुंबीय यांनी लावून धरली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
कानपूर (उत्तरप्रदेश) येथे शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थिनीसमवेत अश्लील कृत्य : शिक्षक सिद्दिकी याला अटक !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील काकडेदेव परिसरात असलेल्या ‘आय अँड आय कोचिंग सेंटर’मधील शिक्षक साहिल सिद्दीकी याने एका विद्यार्थिनीसमवेत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षक साहिल सिद्दिकी याला अटक केली आहे.
‘कोचिंग सेंटर’चे संचालक आशिष श्रीवास्तव यांनी २८ सप्टेंबर या दिवशी आरोपी शिक्षक साहिल सिद्दीकी याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली. शिक्षक साहिल सिद्दीकी याने २६ सप्टेंबर या दिवशी शिकवणी वर्गाच्या प्रसाधनगृहामध्ये सुमारे १० मिनिटे विद्यार्थिनीसमवेत अश्लील वर्तन केले आणि त्याविषयीचा व्हिडिओ बनवला, असे या तक्रारीत म्हटले होते.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |