Chhattisgarh GharVapsi : अंबिकापूर (छत्तीसगड) येथे २२ कुटुंबांतील १०० जणांनी केली ‘घरवापसी’ !
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)
अंबिकापूर (छत्तीसगड) – येथे नुकताच ‘घरवापसी’चा कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली २२ कुटुंबांतील १०० जणांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. ‘श्री शंकराचार्य स्वागत समिती’च्या नेतृत्वाखाली आयोजित ३ दिवसीय हिंदु राष्ट्र धर्मसभेच्या वेळी २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी हा ‘घरवापसी’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती व्यासपिठावर उपस्थित होते. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केलेल्या सर्वांनी शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले.
“Gharwapsi” of 100 people belonging to 22 families in Chattisgarh’s Ambikapur
They received blessings from Shankaracharya Swami Nishchalanand Saraswati@prabaljudevBJP
घर वापसी#Hindutva
PC – @eOrganiser pic.twitter.com/lRMSpCAy3Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2024
शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती गेल्या अनेक वर्षांपासून गोहत्या आणि धर्मांतर यांच्या विरोधात जागृती करत आहेत. ‘प्रत्येक हिंदु सनातनी असावा’, असे त्यांचे म्हणणे आहे. या वेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी केंद्र सरकारला गोहत्या आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदा आणण्याचे आवाहन केले.