Love Jihad Cases : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी ३ तक्रारी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील लव्ह जिहादची तीन वेगवेगळी प्रकरणे उघड झली आहेत. या प्रकरणांमध्ये उत्तरप्रदेशमधील अर्शद, मध्यप्रदेशातील शादाब आणि उत्तराखंडमधील शहजाद यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील पीडितेला गोमांस खाऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर मध्यप्रदेशातील हरदा येथील आदिवासी मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट रचण्यात आला. उत्तराखंडमधील डेहराडून येथील एका घटस्फोटित महिलेच्या आईने तिच्या मुलीला वाचवण्याचे आवाहन केले आहे.
Uttar Pradesh, Madhya Pradesh, and Uttarakhand see 3 new Love J!h@d complaints.
▫️Uttar Pradesh: Arshad forced a Hindu girl to eat beef.
▫️Madhya Pradesh: 19-year-old tribal girl pressured to convert.
▫️Uttarakhand: A Mu$l!m fanatic, disguised as a Hindu, visciously deceives… pic.twitter.com/rIEbUwlVEM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 1, 2024
उत्तरप्रदेश : अर्शदने हिंदु मुलीला गोमांस खाण्यास भाग पाडले
उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लक्ष्मणपुरी येथे २७ सप्टेंबर या दिवशी एका हिंदु महिलेने येथील मडेगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, दीड वर्षांपूर्वी तिची तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या मेजवानीच्या कार्यक्रमात अर्शद नावाच्या मुसलमानाशी भेट झाली होती. दोघांची ओळख झाली आणि त्याचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अर्शदने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास आरंभ केला. अर्शदने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती दोनदा गरोदर राहिली. अर्शदने दोन्ही वेळा तिचा गर्भपात केला. पीडितेने अर्शदवर लग्नासाठी दबाव आणल्यावर त्याने आधी तिला इस्लाम स्वीकारण्याची अट घातली, तसेच गोमांस खाण्यासाठी दबाव आणला. पीडितेने अर्शदच्या वडिलांना त्यांच्या मुलाच्या कृत्याविषयी सांगितल्यावर त्यांनी साहाय्य करण्याऐवजी गप्प रहाण्यास सांगितले. गप्प न राहिल्यास तिला मारण्याची धमकीही दिली. अर्शदचा एक नातेवाईक रशीद यानेही पीडितेला धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अन्वेषण चालू केले असून अर्शदला अटक करण्यात आली आहे. हिंदु महासभेने अर्शदवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मध्यप्रदेश : १९ वर्षीय आदिवारी तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव
मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील १९ वर्षांच्या आदिवासी तरुणीने तिच्या कुटुंबियांसह जिल्ह्यातील हंडिया पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर या दिवशी तक्रार केली. पीडितेने तक्रारीत म्हटले की, २ वर्षांपूर्वी ती सिहोर जिल्ह्यातील शादाब नावाच्या तरुणाच्या जाळ्यात अडकली. शादाबने प्रेमाचे नाटक करून पीडितेचे २ वर्षे लैंगिक शोषण केले. तिने विरोध केल्यावर तो पीडितेला विवाहाचे आश्वासन देऊन गप्प करायचा. यावर्षी २९ मे या दिवशी पीडिता घरी एकटी असतांना शादाब तेथे आला आणि तिने इस्लाम स्वीकारल्यानंतरच तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगितले. २३ ऑगस्टला शादाबने पुन्हा एकदा पीडितेला संपर्क करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या वेळी त्याने पुन्हा त्याने तिला धर्मांतर करण्यास सांगितले, तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. शेवटी पीडितेने कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शादाब याच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
उत्तरराखंड : धर्मांधाने स्वतःचे खोटे नाव सांगून घटस्फोटित महिलेला फसवले
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील शहजाद याने स्वतःचे खोटे नाव सांगून घटस्फोटित आणि दोन मुलांची आई असलेल्या एका हिंदु महिलेला फसवले. या प्रकरणी महिलेच्या आईने २६ सप्टेंबरला रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि शहजादवर कारवाई करण्याची मागणी केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांची ३० वर्षांची मुलगी घटस्फोटित असून ती दोन मुलींची आई आहे. सध्या ती तिच्या दोन्ही मुलींसह तिच्या माहेरी रहात आहे. दळणवळण बंदीच्या काळात या महिलेची शहजाद नावाच्या तरुणाशी भेट झाली. त्या वेळी त्याचे नाव मोनू चौधरी सांगितले होते. मोनू चौधरी उपाख्य शहजाद हा मूळ देहली येथील रहिवासी आहे. काही दिवसांच्या संभाषणात शहजादने पीडित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवले. मोनू हा मुसलमान असल्याचे समोर आल्यानंतरही ही महिला त्याच्याशी विवाह करण्यावर ठाम होती. पीडित महिलेच्या आईने सांगितले की, जेव्हा मी तिला थांबवले, तेव्हा ती रागाने घर सोडून निघून गेली आणि शहजादसह राहिली. जातांना दोन्ही मुलांना आमच्या घरी सोडले आणि आमची दुचाकीही नेली. शहजादने पीडितेचा बुद्धीभेद केल्याचा आरोप महिलेच्या आईने केला असून शहजादवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे ! |