Pakistan Protest Over Nasrallah Death : नसरूल्लाच्या मृत्यूवरून कराचीमध्ये हिंसाचार
कराची (पाकिस्तान) – इस्रायलने हिजबुल्लाचा प्रमुख नसरूल्ला याला बेरूत (लेबनॉन) येथे ठार मारल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानातही आंदोलन करण्यात आले. कराची शहरामध्ये ३ सहस्रांहून अधिक मुसलमानांनी रस्त्यावर उतरून इस्रायल आणि अमेरिका यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. हा जमाव येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलिसांनी जमावाला दूतावासापासून दूरवर रोखले.
Violent Pro-Hezbollah Protests Erupt in Pakistan
Demonstrators target US consulate in Karachi
Pakistani police forces crack down against protesters#Hezbollah leader Hassan Nasrallah was killed in #Israeli airstrikes in Beirut on Sept 27#Hamas pic.twitter.com/Qqo1N9IE0s
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2024
या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात ७ पोलीस घायाळ झाले. आंदोलन अधिक हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. या वेळी जमावाने पोलिसांची वाहने, बसगाड्या आदींची तोडफोड केली.