US Airstrike On Syria : अमेरिकेच्या सीरियावरील आक्रमणात इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांचे ३७ आतंकवादी ठार
दमास्कस (सीरिया) – इस्रायल लेबनॉनवर आक्रमण करत असतांना आता अमेरिकेने सीरियातील इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांच्या तळांवर आक्रमण केले. यात ३७ आतंकवादी ठार झाले. अमेरिकी सैन्याने सांगितले की, त्याने २ वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये कारवाई केली.
US Airstrike On Syria: 37 terrorists of Islamic State and Al Qaeda were killed in the American attack of #Syria .
Israel attacks the bases of #Houthi terrorists in Yemen.
12 jet planes target power projects and port projects.
When will India act like America and Israel… pic.twitter.com/dKZeuZnZV6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2024
सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई आक्रमण करण्यात आले. यामध्ये २८ आतंकवादी मारले गेले. यानंतर उत्तर-पश्चिम सीरियावर करण्यात आलेल्या आक्रमणात अल् कायदाचे ९ आतंकवादी मारले गेले. यात अल् कायदा संघटनेशी संबंधित हुर्रास अल-दिनचा प्रमुख नेता अब्द-अल-रौफ मारला गेला आहे.
|
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने लेबनॉननंतर येमेनमधील हुती आतंकवाद्यांच्या तळांवर हवाई आक्रमण केले. यात हुतीची १२ लढाऊ विमाने, वीज प्रकल्प आणि होदियाह शहरातील बंदर नष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ४ आतंकवादी ठार झाले, तर ५० हून अधिक आतंकवादी घायाळ झाले.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ? |