T Raja Singh : तेलंगाणातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या घराची रेकी करणार्‍या दोघा मुसलमानांना पकडले

आरोपींनी छायाचित्रे अन् व्हिडिओ मुंबईतील ‘व्यक्तीला’ पाठवले

(रेकी करणे, म्हणजे घातपाती कृत्य करण्यासाठी संबंधित ठिकाणाची पहाणी करणे)

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह व त्यांचे घराची रेकी करणारे महंमद खाजा आणि शेख इस्माईल

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या घराची रेकी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ४ संशयितांकडून ही रेकी करण्यात आली. स्थानिक लोकांनी रेकी करणार्‍या दोघा मुसलमानांना २ दिवसांपूर्वी पकडले, तर उर्वरित दोघे पळून गेले. महंमद खाजा आणि शेख इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या मुसलमानांची नावे आहेत.

या संशयितांनी आमदार टी. राजा सिंह यांच्या घराची छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवून मुंबईतील व्यक्तीला पाठवले. त्यांच्या भ्रमणभाषमध्ये टी. राजा सिंह यांची छायाचित्रेही  सापडली आहेत. ही घटना २७ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.

१. एका वृत्तपत्राला दिलेल्या व्हिडिओ संदेशात आमदार टी. राजा सिंह  म्हणाले की, पोलीस दोन्ही संशयितांची चौकशी करत आहेत. २७ सप्टेंबरला मध्यरात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान ४ संशयित त्यांच्या घराभोवती फिरतांना दिसले. काही स्थानिक तरुणांना संशय आल्याने त्यांनी या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी २ जण पळून जात असतांना त्यांना पकडले, तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही मुसलमानांचे भ्रमणभाष तपासले असता त्यांत टी. राजा सिंह आणि त्यांच्या घराची छायाचित्रे अन् व्हिडिओ आढळून आले.

२. व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हॉट्सपवरून मुंबईतील कुणाला तरी पाठवले जात असल्याचा दावा टी. राजा सिंह यांनी केला आहे. पिस्तूल आणि हातगाडीचेही चित्र भ्रमणभाषमध्ये आहे.

३. महंमद खाजा (वय २४ वर्षे) हा मूळचा कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहे. १५ वर्षांपूर्वी तो भाग्यनगर येथे कामाच्या शोधात आला होता. तो भाग्यनगरमधील अल्लापूर बोराबांडा येथे रहात होता. नबी साब असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.

शेख इस्माईल (वय ३० वर्षे) हा भाग्यनगरमधील अल्लापूर बोराबांडा भागात रहातो. शेख इस्माईलच्या वडिलांचे नाव चांद पाशा आहे. शेख इस्माईल हा भाग्यनगरमध्ये चालक म्हणून काम करतो.

४. या घटनेची माहिती तात्काळ स्मंगळहाट पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाहून दोन्ही मुसलमानांना कह्यात घेतले.

५. टी. राजा सिंह यांनी असेही सांगितले की, २९ सप्टेंबरला अटक करण्यात आलेल्या संशयितांविषयी पोलिसांशी चर्चा केली, तेव्हा पोलिसांनी दोघांचीही उच्चस्तरीय चौकशी चालू असल्याचे सांगितले. गुप्तचर विभागाकडूनही त्यांची चौकशी चालू आहे.

६. राजा सिंह यांनी पुढे सांगितले की, वर्ष २०१० आणि २०११ मध्येही इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेशी संबंधित आतंकवाद्यांनी त्यांच्या घराची पहाणी केली होती.

संपादकीय भूमिका

  • जिहादी मानसिकता असलेल्यांना सरकार, पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसल्याचेच हे द्योतक आहे. हे तेलंगाणा सरकारला लज्जास्पद !
  • ‘भारतात अल्पसंख्य असुरक्षित आहेत’, अशी ओरड करणारे इस्लामी देश, तसेच अमेरिका यांना आता या घटनेविषयी काय म्हणायचे आहे ?
  • समस्त हिंदूंसाठी लढणार्‍या सर्वच हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या मागे उभे रहाणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे ! हिंदुत्वनिष्ठांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !