पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव
धाराशिव – सध्या पावसाळ्याचे वातावरण असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे वेळेवर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.