कल्याण येथे अडथळा ठरणारी २२ बांधकामे पाडली !
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १०० हून अधिक पोलीस कर्मचार्यांचा वापर करून कडक बंदोबस्तात ४० फूट डीपी प्लॅन रस्त्याला अडथळा ठरणार्या २५ बांधकामांपैकी २२ बांधकामे पाडली. या वेळी येथील तबेल्यात असणार्या २५० म्हशींना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. काहींनी कारवाईला विरोध केला; मात्र पोलिसांनी त्यांना घटनास्थळावरून हटवले.