त्यागपत्र देण्यास नकार देणार्या गर्भवती हिंदु शिक्षिकेची रस्त्यावरून धिंड काढली !
बांगलादेशातील संतापजनक घटना
ढाका (बांगलादेश) – गर्भवती हिंदु शिक्षिका शिखा राणी रे यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र न दिल्याने गंभीर अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांना मारहाण करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. यावरून लोकांनी टीका करत संबंधितांवर कारवाईची, तसेच मानवाधिकार संघटनांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
मुख्य शिक्षक महंमद बिलाल याने शिखा राणी रे यांना त्या हिंदु असल्याचे सांगत पदाचे त्यागपत्र देण्यासाठी दबाव आणला. शिखा राणी रे यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले गेले. त्यांनी आंदोलन करून त्यागपत्र देण्यास नकार दिला. त्यानंतर वरील घटना घडली.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंना जगात कुणीच वाली नाही ! |