येत्या सप्ताहात दुर्घटनांमध्ये सामूहिक मृत्यूचा धोका ! – सिद्धेश्वर मारटकर, ज्योतिष अभ्यासक
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता !
पुणे – येत्या सप्ताहात ३ ऑक्टोबर या दिवशी अमावास्या आहे. भूकंप, पूर, वादळ यांमुळे हानी होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे पिकांची हानी संभावते. नैसर्गिक आपत्तीमुळेही हानी होऊ शकते. या काळात होणार्या दुर्घटनांमध्ये सामूहिक मृत्यूचा धोका आहे. सीमेवर आतंकवादी किंवा नक्षलवादी संघटनांकडून स्फोटक घटना घडवण्याचे प्रयत्न होतील. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे परिवर्तन संभावते. पेट्रोल-डिझेल यांच्या किमती न्यून होतील. एखादी विमान दुर्घटना घडू शकते. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे अपेक्षित यश मिळू शकते. काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या सहकार्याने सध्या असलेल्या आमदारांसह अधिक आमदार निवडून आणण्यात पक्षाला यश मिळण्याची शक्यता आहे, असे भाकीत पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.