सनातनच्या संतांचे निरीक्षण केल्यावर साधकाला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मला संतांचा सत्संग मिळाला. त्यानंतर मला ‘संत कसे असतात ? त्यांची प्रत्येक कृती कशी असते ? एखाद्या प्रसंगात ते कसे विचार करतात ? ते सर्वांवर निरपेक्ष प्रेम कसे करू शकतात ? त्यांचा साधनाप्रवास कसा असेल ?’, असे अनेक प्रश्न पडत असत. रामनाथी आश्रमातील काही संतांचे मी निरीक्षण केले. संतांकडून कोणती स्पंदने येतात ? माझ्या मनाची विचारप्रक्रिया कशी होते ?’, यांविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
२. संतांचे निरीक्षण केल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे
अ. प्रत्येक सूत्र हे साधनेत अंतर्मुख करणारे, भावस्थितीत घेऊन जाणारे, योग्य दिशा देणारे आणि साधनेत नवीन उत्साह देणारे आहे.
आ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार प्रत्येक संतांकडून येणारी स्पंदने आणि मनात येणारे विचार निरनिराळे असले, तरी ते ईश्वरप्राप्तीची ओढ वाढवणारे आहेत.
इ. व्यावहारिक जीवनातही व्यक्तींचे निरीक्षण केल्यावर वरीलप्रमाणे जाणवत नाही. यावरून संतांचे अद्वितीयत्व लक्षात येते.
गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |