सत्य घटनेतून शिकून हिंदूंनी संघटित होणे काळाची आवश्यकता !
१. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक घटना आली, ‘लंडनमध्ये एक अरब मुसलमान बसमध्ये चढला आणि त्याने बसचालकाला विनंती केली, ‘बसमध्ये वाजणारे पाश्चात्त्य संगीत त्वरित थांबवा; कारण ‘इस्लामच्या शिकवणीनुसार संगीत ऐकणे हराम आहे; कारण प्रिय पैगंबराच्या वेळी संगीत नव्हते आणि विशेषतः पाश्चात्त्य संगीत नव्हते.’ बसचालकाने नम्रपणे रेडिओ बंद केला आणि बसचा दरवाजा उघडला अन् त्या मुसलमानाला बसमधून खाली उतरण्याची विनंती केली. बसचालक म्हणाला, ‘‘प्रिय पैगंबराच्या वेळी बस नव्हती. त्यामुळे तू शांतपणे खाली उतर आणि मुक्कामाला जाण्यासाठी उंटाची वाट पहा.’ त्यानुसार तो मुसलमान बसच्या खाली उतरला.
२. अलीकडे माझ्या वाचनात पुन्हा तशीच एक घटना वाचनात आली, ‘पूर्वी बसमधून उतरलेल्या मुसलमानाने सूड घेण्याचे ठरवले. काही मुसलमानांमध्ये त्याने त्वेष निर्माण करून संघटन केले. पुन्हा तो त्याच बसमध्ये चढला आणि बसचालकाला संगीत थांबवण्यास सांगितले. बसचालकाने मुसलमानास बसच्या खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा मुसलमानाने अन्य मुसलमानांच्या साहाय्याने तो बसचालक आणि अन्य प्रवाशी यांच्यासह बसच जाळून टाकली. स्वतःचा कट्टरतावाद आणि आतंकवाद सिद्ध केला.
यावरून पूर्वी आधुनिक उपकरणे किंवा सोयीसुविधा नव्हत्या; पण आता भोंगे, बाँब, विमान अपहरण, आत्मघाती आक्रमणे आणि विविध प्रकारचे जिहाद सर्वत्र दिसत आहेत, तसेच त्यांची विध्वंसक आणि आतंकवादी वृत्ती वाढली आहे. लोक इस्लामच्या नावाने दुहेरी युक्ती खेळत आहेत. अन्य धर्मियांनीही धर्माचरण आणि साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. सर्वांनी संघटित होऊन धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’साठी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत, हीच आताच्या काळाची आवश्यकता आहे.’ (१५.९.२०२४)
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.