गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हा आपला परमार्थ !
‘जिथे तुम्ही रहाता तिथे सद्गुरु आहेतच’, असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते, ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे, हा आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात् परमात्मा ! त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या ! याहून वेगळे काही करण्याची आवश्यकता आहे, असे न वाटावे. नाम घेणे, हे आपले काम करत रहावे, म्हणजे विकार आपोआपच न्यून होत जातील; मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके आपण जपले पाहिजे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज