सावत्र वडिलांना कंटाळून बदलापूरची अल्पवयीन मुलगी संभाजीनगरमध्ये आली !
बदलापूर – येथील ज्या शाळेत मध्यंतरी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता, त्याच शाळेतील १५ वर्षांच्या मुलीने सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून घर सोडले. रात्रीच्या रेल्वेने प्रवास करून ती छत्रपती संभाजीनगर शहरात पोचली. ती दिवसभर रेल्वेस्थानकातच बसून होती. हे समजताच ‘दामिनी’ पथकाने मुलीस सुखरूप कह्यात घेतले आहे. महिला पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाला संपर्क केला. यानंतर तिची आई रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला घेण्यासाठी आली होती.