Hashem Safiddin Hezbollah: हाशेम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा नवीन प्रमुख


बेरूत (लेबनॉन) – इस्रायली हवाई आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख नसराल्ला ठार झाल्यानंतर हाशेम सफीद्दीन याला प्रमुख करण्यात आले आहे. तो नसरल्लाचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

हाशेम सफीद्दीन हिजबुल्लाच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख म्हणून राजकीय घडामोडींवर देखरेख ठेवण्याचे काम करतो आणि जिहाद परिषदेतही भाग घेतो. ही जिहाद परिषदच हिजबुल्लाच्या सैनिकी कारवायांचे संचालन करते.