Udhayanidhi Stalin : सनातन धर्म नष्‍ट करण्‍याचे विधान करणारे उदयनिधी स्‍टॅलिन बनले तमिळनाडूचे उपमुख्‍यमंत्री !

कारागृहातून सुटून आलेल्‍या माजी मंत्र्याला पुन्‍हा बनवले मंत्री !

उदयनिधी स्‍टॅलिन

चेन्‍नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांनी त्‍यांचे मंत्री असणारे पुत्र उदयनिधी यांना राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री बनवले आहे. त्‍यांच्‍या शपथविधी २९ सप्‍टेंबरला करण्‍यात आला. त्‍याच समवेत २ दिवसांपूर्वी कारागृहातून सुटून आलेले सेंथिल बालाजी यांनाही मंत्री बनवण्‍यात आले आहे. डॉ. गोवी. चेझियान, थिरू आर्. राजेंद्रन् आणि थिरू एस्.एम्. नासर यांनाही मंत्री बनवण्‍यात आले आहे. सेंथिल बालाजी यांना गेल्‍या वर्षी जून महिन्‍यात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्‍ये त्‍यांनी मंत्रीपदाचे त्‍यागपत्र दिले होते.

काही महिन्‍यांपूर्वी उदयनिधी स्‍टॅलिन यांनी ‘सनातन धर्म समानता आणि सामाजिक न्‍यायाच्‍या विरोधात आहे. त्‍यामुळे अशा गोष्‍टींना विरोध करण्‍याऐवजी त्‍यांचे समूळ उच्‍चाटन करायला हवे. डेंग्‍यू, मलेरिया आणि कोरोना यांसारख्‍या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्‍यांचे उच्‍चाटनच करायला हवे. त्‍याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्‍चाटन व्‍हायला हवे’, असे म्‍हटले होते.

संपादकीय भूमिका

सनातन धर्मावर टीका करणार्‍या द्रमुकची मानसिकता किती अधर्मी आहे, हेच यातून स्‍पष्‍ट होते ! हिंदुद्वेष नसानसांत भारलेली व्‍यक्‍ती एका राज्‍याची उपमुख्‍यमंत्री होणे, हे त्‍या राज्‍यातील हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद आहे !