FIR Against Afzal Ansari : ‘साधू-संत मठांमध्ये गांजा ओढतात’, असे म्हणणारे समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद

समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – साधू-संत मठांमध्ये गांजा ओढतात. लक्ष्मणपुरीमध्ये ते धूम्रपान करत होते. महाकुंभासाठी गांजाची मालगाडी पाठवली, तर तीसुद्धा संपेल, असे हिंदुद्वेषी विधान करणारे समाजवादी पक्षाचे खासदार आणि हत्या झालेल्या कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा भाऊ अफझल अन्सारी यांच्याविरुद्ध पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला आहे. अफझल यांनी ३ दिवसांपूर्वी हे विधान केले होते.

गांजाचा वापर कायदेशीर करण्याची मागणी

अफझल अन्सारी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, गांजाचा वापर कायदेशीर केला पाहिजे. कोट्यवधी लोक उघडपणे गांजा ओढतात. ते त्याला ‘देवाचा प्रसाद’ म्हणतात आणि देवाचे औषधे म्हणून पितात. जर ती देवाची औषधी वनस्पती असेल, तर ती बेकायदेशीर का आहे ? तुमच्या योगी बाबांना (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना) गांजाला कायदेशीर मान्यता देण्यास सांगता. जर गांजा कायद्याने बेकायदेशीर असेल, तर धूम्रपान करण्यास अनुमती का आहे ? हे दुहेरी धोरण चालणार नाही. कुंभपर्वाच्या काळात गांजाची संपूर्ण मालगाडी पाठवली, तर ती संपेल. साधू, संत, महात्मा आणि समाजातील अनेक लोक मोठ्या आवडीने गांजा ओढतात. विश्‍वास बसत नसेल, तर माझ्यासमवेत गाझीपूरच्या मठात या आणि बघा. गांजाला कायद्याचा दर्जा देण्याची माझी मागणी आहे.

प्रसारमाध्यमांना उद्देशून अन्सारी म्हणाले की, तुमच्या योगी बाबांना सांगा की, बिहार सीमेवर चालू झालेले नवीन दारूचे दुकान बंद करा. ‘दारूची दुकाने वाढवा’, असे कोणत्या धर्मात म्हटले आहे ? (अन्य धर्मियांसाठी पूजनीय असणार्‍या मूर्ती तोडून टाका, अन्य धर्मियांच्या महिलांवर बलात्कार करा, त्यांना पूजनीय असणार्‍या गायींची हत्या करा, अन्य धर्मियांना धर्मांतरित करा, त्यांची प्रार्थनास्थळे पाडून तेथे स्वतःच्या धर्माची प्रार्थनास्थळे बांधा, अन्नपदार्थांमध्ये थुंका किंवा लघवी करा, हे कोणत्या धर्मात सांगितले आहे ?, हे अन्सारी सांगतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

मशिदी आणि मदरसे यांमधून जिहादी आतंकवादी निर्माण होतात, शस्त्रसाठा जप्त होतो, बलात्काराच्या घटना घडतात, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, यांविषयी अफझल अन्सारी का बोलत नाहीत ?