गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
कात्रज (जिल्हा पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गडकिल्ले संवर्धन सेल’चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, तसेच या मागणीचे पत्रही उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) गेल्या ५ वर्षांत सातत्याने ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने गड-दुर्गांचे तट, बुरूज, सीमाभिंत, पायवाटा, वाहन वाटा, पायर्यांकडेच्या दरडी कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे. गड-दुर्गांचा भक्कमपणा कायम रहाण्यासाठी प्रमुख गडांच्या सर्वेक्षणाचे काम आणि उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर गड-दुर्गांना पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी महामंडळ स्थापन होण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.