पाषाण (पुणे) येथील समस्त हिंदूंनी उभारलेल्या ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’चा संघर्षमय लढा !
मशिदीचे अवैध बांधकाम भुईसपाट
मुसलमान समाजाला कब्रस्तान (दफनभूमी) म्हणून दिलेल्या जागेचा उपयोग इतर धार्मिक कार्यांसाठी करणे, कब्रस्तानच्या जागेत मशीद उभी करणे, नमाजपठण करणे, धार्मिक शिक्षण देणे आदी कृत्यांतून मुसलमानांकडून वर्चस्व प्रस्थापित करणे चालू होते. या सर्व प्रकारांच्या विरोधात स्थानिक हिंदु बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष उभा केला; मात्र अनधिकृत बांधकाम (मशीद) पाडण्यासाठी हिंदूबहुल भागात हिंदूंना प्रशासनाशी तब्बल १५ वर्षे लढा द्यावा लागतो, ही अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक गोष्टच म्हणावी लागेल. भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत, यासाठी हिंदु समाज बांधवांनी वेळीच सतर्क होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
१. महानगरपालिकेच्या शासकीय कब्रस्तानच्या जागेत मुसलमानांकडून विनाअनुमती अनधिकृत बांधकाम !
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पाषाण भागातील सुतारवाडी हे गाव. हिंदु धर्मानुसार वर्षभरातील सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. आषाढी-कार्तिकीला श्री क्षेत्र पंढरपूरची वारी करणारे वारकरी, तसेच नेहमी भजन-कीर्तनात रममाण होणारे आणि सांप्रदायिक अनुष्ठान असलेले हिंदूबहुल लोकवस्ती असणारे गाव म्हणजेच सुतारवाडी !
सुतारवाडी गावाच्या स्मशानभूमीलगत असणार्या महानगरपालिकेच्या शासकीय कब्रस्तानच्या जागेत मुसलमानांनी विनाअनुमती अनधिकृत बांधकाम केले. गेली अनेक वर्षे कब्रस्तानाचा अवैधपणे उपयोग करून जमाव गोळा करणे, सामुदायिक नमाजपठण करणे, धार्मिक शिक्षण देणे, लोकांच्या वास्तव्यासाठी जागेच वापर करणे. या कृत्यांमुळे सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडू लागले. मुसलमानांच्या बेकायदेशीर कृत्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला.
२. नमाजपठणासाठी ३ – ४ सहस्र मुसलमान जमणे आणि त्यातून हिंदूंवर दहशत निर्माण करणे
सुतारवाडी पाषाण परिसरातील मूळ मुसलमानांची संख्या ५० च्या जवळपास असतांनाही कब्रस्तानच्या आवारात मात्र नमाजपठणासाठी ३ – ४ सहस्र मुसलमान जमू लागले. किंबहुना त्यांना पाचारण करण्यात येत होते. त्या गर्दीची दहशत ग्रामस्थ आणि परिसरातील हिंदु रहिवासी यांच्यावर बसावी, हा त्यामागचा हेतू होता. झालेही तसेच !
नमाजाच्या कालावधीत येण्या-जाण्याचा मुख्य रस्ता बंद होऊ लागला. अंत्यविधीसाठी नेण्यात येणार्या अंत्ययात्रा थांबवल्या जाऊ लागल्या. मुसलमानांचा त्या परिसरातील वावर वाढू लागला. त्यामुळे त्यांची दहशत आणि उपद्रव वाढला. हिंदूंचे अंत्यविधी आणि निरंतर चालणारे मरणोत्तर विधी यांना अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे स्थानिक हिंदु रहिवाशांच्या भावना दुखावल्या जात होत्या. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
३. हिंदूंकडून निवेदने देऊनही प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ !
सुतारवाडी ग्रामस्थांनी महानगरपालिका प्रशासनास वेळोवेळी अवगत केले, तसेच निवेदनेही दिली. असे असतांनाही वरील प्रकारांविरोधात संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली नाही. कारवाई करण्यास दुर्लक्ष करून टाळाटाळ केली.
४. हिंदूंकडून ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’ स्थापन करून संघर्षास प्रारंभ !
शेवटी कब्रस्तानामध्ये अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकाम (मशीद) काढण्यासाठी तेथे बेकायदेशीर जमाव जमवून चालणारे नमाजपठण बंद करणे, अंजुमन (धार्मिक शिक्षण देणे) बंद करावे, यासाठी सुतारवाडी, पाषाण आणि सोमेश्वरवाडी या गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’ स्थापन करून संघर्षास प्रारंभ केला. शासन-प्रशासन यांना निवेदने देणे, संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटी घेणे, माहितीच्या अधिकारांतून माहिती मिळवणे, लोकांना जागृत करणे, आंदोलने करणे हे सर्व कार्य चालू होते. हा लढा हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील महत्त्वाच्या व्यक्ती आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य अन् मार्गदर्शन यांखाली करण्यात येत होता. ‘सुतारवाडी नागरी कृती समिती’ने सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी कृती समितीच्या संघर्षाला यश आले.
५. प्रशासनाने अनधिकृत बांधकाम पाडणे
३१ ऑगस्ट २०२४ या दिवशी पहाटे पुणे महानगरपालिका प्रशासनाने कायदेशीररित्या कब्रस्तानातील अनधिकृत बांधकाम पाडले. या यशस्वी लढ्याला सर्वच हिंदु नागरिक, विविध हिंदु संघटना, राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला.
संपादकीय भूमिकाकब्रस्तानातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी नागरिकांना लढा द्यावा लागणे, हे पोलीस आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद ! |