शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !

टोलमाफीसाठी १५ दिवसांची मुदत !

शिरपूर टोलनाका

शिरपूर (जिल्हा धुळे) – गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे. येथे टोल रहित केला जावा आणि महामार्गाची दुरुस्ती व्हावी, या मागण्यांसाठी टोलनाक्यावर मोर्चा काढण्यात येणार होता. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलन करणार्‍या ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि शिरपूर टोल आस्थापनाच्या पदाधिकार्‍यांशी त्यांची चर्चा घडवून आणली. त्यानंतर आस्थापनाच्या पदाधिकार्‍यांनी टोलमाफीच्या संदर्भात सकारात्मक पत्र दिले. त्यामुळे हा मोर्चा रहित करण्यात आला. १५ दिवसांत टोल रहित न झाल्यास शिरपूरची जनता परत मोठे आंदोलन करेल, अशी चेतावणी ‘शिरपूर फर्स्ट’ या संघटनेने दिली आहे.