आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील ‘अरंगेत्रम्’ नृत्य आविष्काराचे आयोजन २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. जालनावाला कलानिकेतन, नवी मुंबई आणि श्री माता निर्मलादेवी नृत्य झंकार नृत्य संगीत अकादमी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ‘अकादमी’च्या विद्यार्थिनी डॉ. नेहाली अनारसे-पटेल आणि डॉ. जुईली कुलकर्णी हे कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. ‘या कार्यक्रमास नृत्यप्रेमी नवी मुंबईकरांनी आवर्जून उपस्थित रहावे’, असे आवाहन ‘जालनावाला कलानिकेतन’च्या संचालिका  अनुराधा जालनावाला यांनी केले आहे.