राजकीय स्वार्थासाठी काहींचे बांगलादेशींना साहाय्य ! – नरेंद्र पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ
पंढरपूर – काही लोक त्यांचे मतदान वाढवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड अन् पॅनकार्ड बनवून देतात. त्यांचे नाव मतदारसूचीत घालून त्यांना अधिकृत मतदार केले जाते. देशाच्या विरोधात असलेल्या अशा लोकांना असे पुरावे बनवून देणे हे दुर्दैवी आहे. अशा प्रकारे मतदान वाढवून एखादा नगरसेवक निवडून येऊ शकतो; मात्र हेच घुसखोर देशात अंतर्गत आक्रमण करण्यासाठी कारणीभूत होतात, हे या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे परखड मत आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.