कसमादे (मालेगाव) येथे अंत्यविधीसाठी प्रतिदिन १४ सहस्र गोवर्‍यांचा वापर !

मालेगाव – येथील कसमादे तालुक्यात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि वृक्षतोड थांबवावी, यासाठी अंत्यविधीच्या वेळी लाकडांच्या ऐवजी गोवर्‍यांचा वापर केला जात आहे. येथे शहर आणि परिसरात दिवसाला १४ सहस्र गोवर्‍यांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे १५० महिलांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते मे या काळात येथे १५ लाख गोवर्‍या सिद्ध करून ठेवल्या जातात. येथे पांजरपोळ आणि इतर गायींच्या गोठ्यामधून शेण गोळा करून गोवर्‍या सिद्ध केल्या जातात.