Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

घातपाताच्या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर विभागाची दक्षतेची चेतावणी

हाजीअली दर्ग्यात बाँब ठेवल्याची धमकी

मुंबई – आतंकवादी संघटनांकडून मुंबईत घातपात घडवण्याच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या चेतावणीनंतर मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयात दूरभाष करून एकाने बाँब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यामुळे गर्दीची ठिकाणे आणि प्रार्थनास्थळे येथे ‘मॉकड्रिल’ (सुरक्षेच्या दृष्टीने केली जाणारी चाचपणी) करण्यात येणार आहे.

मुंबईत मंदिर व्यवस्थेत सुरक्षा वाढ

१. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणारा सणासुदीचा काळ, तसेच विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन ‘मॉकड्रिल’ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.