Criminals Beg In Mumbai : मुंबई रेल्‍वेस्‍थानक, बाजार आदी ठिकाणी भिकार्‍यांच्‍या वेशात समाजकंटकांकडून मागितली जाते भीक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, २८ सप्‍टेंबर (वार्ता.) – ‘गावाहून आलो आहोत. परत जाण्‍यासाठी पैसे नाहीत. तिकिटापुरते पैसे द्या’, असे म्‍हणून भीक मागण्‍याचा नवीन प्रकार मुंबईत रूढ झाला असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होत आहे. रेल्‍वेस्‍थानके, पेट्रोलपंप, पादचारी मार्ग, बसस्‍थानके, बाजारपेठा यांसारखी गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी सर्वसामान्‍य कुटुंबातील व्‍यक्‍तीप्रमाणे सामान्‍य पोशाखातील महिला आणि पुरुष येणार्‍या-जाणार्‍यांकडे अशा प्रकारे भीक मागतात. यांतील भीक मागणार्‍या काही व्‍यक्‍ती तर पैसे देण्‍यासाठी मागे लागतात.

भीक मागणार्‍या महिला

मागील काही महिन्‍यांपासून मुंबईमध्‍ये ‘तिकिटापुरते पैसे द्या’, ‘जेवण करण्‍यासाठी पैसे द्या’, ‘औषधासाठी पैसे द्या’, असे म्‍हणत पैसे मागणार्‍यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्‍ये महिलांचे प्रमाण अधिक दिसून येते. अनेकदा पती-पत्नी जोडपीही अशा प्रकारे पैसे मागतांना आढळतात. यामध्‍ये पुरुषांनी चांगल्‍या प्रकारे धोतर नेसलेले असते, तर महिलाही नऊवारी साडी नसलेल्‍या नीटनेटक्‍या पोषाखात आढळून येतात आणि ग्रामीण भागातील दिसून येतात. मुंबईतील मोठमोठ्या रुग्‍णालयात शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी आसलेल्‍या रुग्‍णांचे नातेवाईक किंवा जवळची मंडळी उपचारासाठी अनेक दिवस लागत असल्‍यामुळे त्‍या कालावधीत येणार्‍या आर्थिक अडचणींमुळे अशा प्रकारे पैसे मागत असण्‍याची शक्‍यता दिसून येते.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना कारागृहात डांबून त्‍यांच्‍याकडून भीक म्‍हणून लुबाडलेली रक्‍कम वसूल करून घ्‍यायला हवी !