Bangladeshi Workers Increased : बाजारपेठेत बांगलादेशी माथाडी कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ !
|
नवी मुंबई – येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे आणि भाजीपाला बाजारपेठेत बांगलादेशी माथाडी कामगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मराठी माथाडी कामगारांना रोजगार मिळत नाही. एकट्या फळबाजारातच ५० टक्क्यांहून अधिक बांगलादेशी कामगार आहेत. बाजार समितीकडेही या कामगारांची प्रत्यक्ष नोंद नाही. कामावर असणार्या कामगारांची माहिती प्रशासनाकडून व्यापार्यांकडे मागितली जाते; मात्र खरी माहिती प्रशासनाला दिली जात नाही. या कामगारांच्या रहाण्याची व्यवस्था बाजारात केली जाते. हे कामगार मिळेल त्या पैशांत कोणतेही काम करतात. ‘या बांगलादेशी कामगारांवर प्रभावीपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे’, अशी प्रतिक्रिया माथाडी कामागार नेते नरेंद्र पाटील दिली. या समस्यकडे त्यांनी नुकतेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधले आहे.
१. येथे वास्तव्यास असणारे बांगलादेशी कामगार बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक बनवतात. ते दुपारपर्यंत हमाल म्हणून काम करतात आणि संध्याकाळी फळ बाजारपेठेच्या बाहेरील रस्त्यावर फळे, भाजीपाला आणि अन्य माल यांची पदपथावर विक्री करतात.
२. अनेकदा त्यांच्यात आपासांत वाद होऊन हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|