Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी

  • सीसीटीव्हीच्या चित्रणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित

  • अद्याप तक्रार किंवा गुन्हा नोंद नाही

बेंगळुरू येथील  गाळी आंजनेय मंदिर

बेंगळुरू (कर्नाटक) : शहरातील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात मंदिरातील कर्मचार्‍यांनीच दानपेटीतील पैसे चोरल्याची घटना घडली. दानपेटीतील पैसे मोजतांना ही घटना घडली.

गाळी आंजनेय मंदिरात मंदिरातील कर्मचार्‍यांनीच दानपेटीतील पैसे चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्ही कॅमेरे असतांनाही त्यांनी पैसे चोरून खिशात टाकले. ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा (बंडल) चोरण्यात आला आहे. चोरीचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध झाले आहे. या प्रकरणी सध्या तरी कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचा आणखी एक दुष्परिणाम जाणा !
  • अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे कसे ? ज्यांच्याकडे मंदिरांचे रक्षण आणि देखभाल करण्याचे दायित्व आहे, तेच जर असे करत असतील, तर विश्‍वास कुणावर ठेवायचा ?