J&K Terrorists Shot Dead : काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

  • ३ सैनिक आणि १ अधीक्षक घायाळ

  • आतंकवाद्यांच्या ६ स्थानिक साथीदारांना अटक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार मारले. यात ३ सैनिक आणि कुलगामचे विशेष पोलीस अधीक्षक घायाळ झाले आहेत.

दुसरीकडे पोलिसांनी अवंतीपोरा, पुलवामा येथे जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्यांच्या स्थानिक ६ साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून ५ बाँब, ३० डिटोनेटर्स, १७ बॅटरी, २ पिस्तुले, ३ मॅगझिन, २५ काडतुसे, ४ हातबाँब आणि २० सहस्र रुपये जप्त करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांना साहाय्य करणारे कोण आहेत ?, हे स्पष्ट आहे. काश्मीरमधील आतंकवादाला धर्म असल्यानेच तो नष्ट होत नसून त्याला स्थानिक नागरिक साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या !