Hezbollah Chief Nasrallah Killed : हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार ! – इस्रायली सैन्याचा दावा
इस्रायलकडून हिजबुल्लाचे बेरूत येथील मुख्यालय उद्ध्वस्त !
बेरूत (लेबनॉन) – इस्रायलने २७ सप्टेंबरच्या रात्री बेरूत येथील हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेच्या मुख्यालयावर केलेल्या हवाई आक्रमणात या संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे; मात्र हिजबुल्लाने याला दुजोरा दिलेला नाही. या आक्रमणात ६ जण ठार झाले. यासह नसरूल्लाची मुलगी झैनब हीसुद्धा ठार झाली आहे. इस्रायलने केलेले हे आक्रमण प्रचंड क्षमतेचे होते. यामुळे ‘३ रिक्टर स्केलवर भूकंप होऊ शकतो, इतकी यात क्षमता होती’, असे तज्ञांकडून सांगण्यात आले. या आक्रमणामुळे मुख्यालयातील कुणीही जिवंत राहू शकत नाही, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ज्या वेळी इस्रायलने हे आक्रमण केले, तेव्हा त्याचे पंतप्रधान नेतन्याहू संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करत होते.
🚨Hezbollah Chief Hassan Nasrallah Killed ! – Claims the Israeli Army
▫️Hezbollah’s Beirut headquarters destroyed by #Israel
👉 #India should learn from Israel on ending terrorism by killing J!h@d! terrorists. Had India done this 30 years ago, India would have been free from… pic.twitter.com/nq0MjAsOEe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 28, 2024
इस्रायलच्या सैन्याने बेरूतसह लेबनॉनमधील अनेक भागांवर क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायलने बेरूतच्या दहियाह भागात रहाणार्या लोकांना तातडीने परिसर रिकामा करण्यास सांगितला. इस्रायलच्या सैन्याचे म्हणणे आहे की, हिजबुल्ला इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी येथील ठिकाणांचा वापर करत आहे.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद्यांना ठार मारून आतंकवाद कसा संपवायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकले पाहिजे ! भारताने ३० वर्षांपूर्वीच असे केले असते, तर भारतातील जिहादी आतंकवाद तेव्हाच नष्ट झाला असता ! |