Maulvi Attacked In Ghaziabad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मदरशात शिवीगाळ करणार्या मौलवीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील तोडी तेराह बिस्वा गावातील एका मदरशात शिकणार्या १४ वर्षीय विद्यार्थ्याला मौलवी आस महंमद याने शिवीगाळ केल्याने त्याने मौलवीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. यात मौलवी घायाळ झाला. नंतर विद्याथ्याने येथून पलायन केले. मौलवी आस महंमद गंभीररित्या घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकामदरशांत विद्यार्थ्यांना जे शिकवले जात आहेत, तेच ते प्रत्यक्ष करून दाखवत आहेत, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? अशा मदरशांवर आता देशात बंदी घालण.े हाच यावरील एकमेव उपाय आहे ! |